Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रकुल स्पर्धेचा रंगतदार समारोप! ६१ पदकांवर कोरलं भारताने नाव.

राष्ट्रकुल स्पर्धेच्या २२ व्या हंगामात भारतासाठी एकूण किती पदकं

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

इंग्लंड 10 आगस्ट :-  

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये नुकतेच कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा नुकताच समारोप झालाय. जगातील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत गेल्या 11 दिवसांत पाच हजारांहून अधिक खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. यादरम्यान ऑस्ट्रेलियन संघ हा वरचढ असल्याचा पाहायला मिळालं. मात्र याच सोबत भारतीय खेळाडूंनीही चांगली कामगिरी करत घवघवीत यश संपादन केलय. सर्वाधिक पदके मिळवण्याच्या बाबतीत टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर आहे. भारताने यंदा या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. एकूण 61 पदकांवर भारताने यंदा आपल नाव कोरलं आहे .कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये भारताला कुस्तीमध्ये सर्वाधिक पदक मिळाली आहेत.
दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेच्या २२ व्या हंगामात भारतासाठी एकूण किती पदकं जिंकून दिलेत हे पाहुयात. भारताने यंदा एकूण ६१ पदकांवर आपलं नाव कोरलं असून यामध्ये २२ सुवर्णपदकं आहेत, तर १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकं भारताने खिशात घातली आहेत. यंदा सर्वाधिक पदकं भारताला कुस्तीमध्ये मिळाली आहेत. भारताच्या १२ च्या १२ कुस्तीपटूंनी पदकं मिळवली असून १० पदकं वेटलिफ्टिंगमध्ये मिळवली आहेत, तर बॉक्सिंगमध्येही भारताने तब्बल ७ पदकं जिंकली आहेत. भारत ६१ पदकांसह चौथ्या स्थानी राहिला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

समारोप समारंभात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा 23वा हंगाम कुठे खेळवला जाईल, हेही निश्चित करण्यात आले आहे.
कॉमनवेल्थ गेम्सचा 23वा मोसम आता ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाखाली 2026 मध्ये व्हिक्टोरिया येथे खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 23 व्या हंगामात चाहत्यांना अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. अनेक शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा येथे प्रथमच लोकांना पाहायला मिळणार आहेत. असे सांगितले जात आहे की 2026 मधील कॉमनवेल्थ गेम्स व्हिक्टोरियातील बल्लारट, जिलॉन्ग, बेंडिगो आणि गिप्सलँड या प्रमुख शहरांमध्ये होणार आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  • बर्मिंगहॅम गेम्सचा रंगतदार समारोप.
  • भारताने मिळवलं घवघवीत यश.
  • ६१ पदकांवर कोरलं भारताने नाव.
  • यंदा भारत ६१ पदकांसह चौथ्या स्थानी.
  • कुस्तीमध्ये मिळवली सर्वाधिक पदकं.
  •  २२ सुवर्ण,१६ रौप्य, आणि २३ कांस्य पदकं पटकावली.

हे देखील वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.