Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून चंद्रपूर जिल्ह्यात ३० ऑक्सिजन कान्सट्रेटर चे वितरण

खा. अशोक नेते व माजी आ. अतुल देशकर यांच्या उपस्थितीत वितरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : CII फाउंडेशन च्या सामाजिक दायित्व निधी (CSR) च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग यांच्या मदतीने माजी पालकमंत्री तथा आम. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून ३० ऑक्सिजन कान्सट्रेटर चे वितरण आज दि २९ मे रोजी माजी वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, माजी जि. प. अध्यक्ष तथा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्ह्यातील राजुरा, भद्रावती, गोंडपिपरी, वरोरा व घुग्गुस या ५ तालुक्यात ५-५ तसेच मुल तालुक्यातील चिरोली व मारोडा या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ५ असे एकूण ३० ऑक्सिजन कान्सट्रेटर चे वितरण आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

म्युकरमायकोसिस ग्रस्तांच्या उपचारासाठी आता खनिज विकास निधीतून मदत – मंत्री विजय वडेट्टीवार

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चंद्रपूर : CTPS प्रकल्पग्रस्त मृतक कामगाराला योग्य मोबदला देण्यात यावा – राजू झोड़े

 

 

 

Comments are closed.