Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रामजन्मभूमीसाठी आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी दिला एक लाखांचा निधी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. १२ फेब्रुवारी: श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण व गृह संपर्क अभियान अहेरी नगर अंतर्गत अहेरी विधानसभा क्षेत्राचे  आ. धर्मराव बाबा आत्राम महाराज यांनी 1,11,111/- (₹. एक लक्ष अकरा हजार एकशे अकरा रुपये) श्रीराम जन्मभूमी मंदिर  निर्माण कार्यास समर्पित केला आहे.

या कार्यास संपूर्ण समाजाने या अभियानात तन मन धन पूर्वक आपले योगदान देऊन या राष्ट्र निर्माण कार्यात आपला वाटा उचलावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी  आ. धर्मराव बाबा आत्राम  यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक प्रसाद महानकर यांना समर्पण निधी सुपूर्द केला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांची उपस्थिती होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.