Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज 251 कोरोनामुक्त, 3 मृत्यूसह 43 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. 27 मे : आज जिल्हयात 43 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 251 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29032 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 27069 वर पोहचली. तसेच सद्या 1256 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 707 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 3 नवीन मृत्यूमध्ये कालीनगर ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय महिला, हाल्दी ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 28 वर्षीय पुरुष व वायगाव ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय महिला यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.24 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.33 टक्के तर मृत्यू दर 2.44 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

gadchiroli corona

नवीन 43 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 13, अहेरी तालुक्यातील 04, आरमोरी 01, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 07, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 09, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 01, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 01, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 02 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 05 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 251 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 62, अहेरी 20, आरमोरी 13, भामरागड 04, चामोर्शी 64, धानोरा 13, एटापल्ली 06, मुलचेरा 28, सिरोंचा 16, कोरची 05, कुरखेडा 07 तसेच वडसा येथील 13 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : 

कोरोना संसर्गापासून लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स गठीत

संतापजनक! पाच वर्षीय चिमुकलीवर ५० वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार

Comments are closed.