Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वादळ वारा, गारपीट नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी – दिलीप घोडाम

Get real time updates directly on you device, subscribe now.

– माजी आ. आनंदराव गेडाम यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांची राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी, दि. ३ मे : तालुक्यात १ मे रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास वादळ वाऱ्यासह गारपीटीसह अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आधीच कोरोनाच संकट असतांना पुन्हा अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आदिवासी कॉंग्रेसचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरमोरी तालुक्यात पाथरगोटा, पळसगाव, शंकरनगर, जोगीसाखरा, रामपुर परीसरात १ मे रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास आलेल्या अवकाळी चक्रिवादळ गारपिटीच्या तडाख्याने रब्बी पिकांचे व कवेलुच्या घराचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे शेतातील रब्बी धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वारा, गारपीटीने हजारो रुपायचे नुकसान झाल असल्याची माहिती शेतकरी ईश्वर ठाकरे यांनी दिलीप घोडाम यांना दिली असता याची दाखल घेऊन माजी आ. आनंदराव गेडाम यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी पाथरगोटा, पळसगाव, शंकरनगर, जोगीसाखरा, रामपुर येथील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन प्रत्यक्ष पिकाची पाहणी केली असता तात्काळ शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाची व कवेलूच्या घराचेही नुकसानीचे मोका पंचनामा करून मदत देण्यात यावी. अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम यांच्या मार्गदर्शनात दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी मोतीलाल लिंगायत नारायण सरकार जगन पत्रे संजय मडावी, ईश्र्वर ठाकरे, कार्तिक मातेरे,  भुमेश्वर राऊत, हरीहर मातेरे उचित मातेरे,  मच्छिंद्र मेत्राम,  यशवंत मातेरे, बाजीराव बगमारे, विलास पेन्दाम, भैयाजी कन्नाके आदि उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.