Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चामोर्शीतील महामार्गाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

चामोर्शी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची सामाजिक कार्यकर्ते राकेश खेवले यांची मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : गडचिरोली ते आष्टी महामार्गाचे बांधकाम टप्या टप्प्यात कंत्राटदाराकडून करण्यात येत आहे. महामार्गावर असलेल्या चामोर्शी शहरात सध्या बांधकाम सुरु आहे. त्या बांधकामासाठी  चामोर्शी शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे खोलीकरण करण्यात आले आहे. परंतु त्या पुढील काम हे अतिशय संथ गतीने होत असल्यामुळे  पावसाळ्यात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वेळप्रसंगी खोदण्यात आलेल्या नालीचे बांधकाम पूर्ण न झाल्यास त्या नालीद्वारे सांडपाण्यासोबत  घाण कचरा जमा होवून पाणी उतार भागातील घरात जाण्याची शक्यता असून रोगराई पसरण्याची शक्यता असू शकते. सध्या देशभरात कोव्हीड-१९ ने थैमान घातले असल्याने प्रत्येक परिवार स्वतःची काळजी घेत आहे आणि अशातच पावसाळ्यापूर्वी नालीचे बांधकाम, साफसफाईसह  राष्ट्रीय महामार्गाचे चामोर्शी शहरातील काम पूर्ण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राकेश खेवले यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गेल्या काही दिवसापासून गडचिरोली – चामिर्शी महामार्गाचे काम सुरू असून ते खोदकाम काम येथील बसस्थानक परिसरात केले मात्र खोदकाम करताना ऐक  बाजू चे काम पूर्ण न  करता दुसर्याही बाजूचे खोदकाम केल्यामुळे व धुळीमुळे व्यवसायिकांना  व नागरिकांना  त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नाली बांधकाम सुरू असल्याने गावातील नाल्या पॅक  झाल्यामुळे तेथील घाण साचलेला पाणी हा रस्त्यावर साचत असल्याने चिखल निर्माण झाला आहे त्यामुळे वाहतूकदारांना वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे तसेच ते पाणी पूर्णपणे बाहेर न पडत असल्यामुळे घाण वास सुद्धा येत आहे त्यामुळे चामोर्शी शहरातील रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राकेश खेवले यांनी केली आहे.

रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आपली वाहणे नेने व काढणे कठीण झाले असून वाहन रस्त्यावर किव्हा इतरत्र कुठेही ठेऊन घरी जावे लागत आहे तर व्यायसिकाना सुद्या याचा मोठा फटाका बसत आहे, तर या खोदकमामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.  त्यासाठी एक बाजू पूर्ण करावी वाहतूक व्यवस्था सुरळीत करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. या कामाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गडचिरोली जिल्ह्याला भेट

कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांना परस्पर दत्तक घेणे कायदयाने गुन्हा

 

 

Comments are closed.