Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक… गडचिरोली जिल्ह्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

गडचिरोली जिल्ह्यात आज ६२७ कोरानामुक्त, ५१६ नवीन कोरोना बाधित तर १७ जणांचा कोरोनाने मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ४ मे: आज जिल्हयात 516 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 627 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 23012 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 18287 वर पोहचली. तसेच सद्या 4260 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 465 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 17 नवीन मृत्यूमध्ये 36 वर्षीय पुरुष रामकृष्णपूर ता.चामोर्शी, 51 वर्षीय पुरुष जोगीसाखरा ता. आरमोरी, 68 वर्षीय महिला गडचिरोली, 38 वर्षीय पुरुष ता. अहेरी, 58  वर्षीय पुरुष ता. ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर, 61 वर्षीय महिला अहेरी, 66 वर्षीय महिला वाघाडा बर्डी ता.आरमोरी, 40 वर्षीय पुरुष उमरी ता.चामोर्शी , 48 वर्षीय महिला गडचिरोली, 75 वर्षीय महिला नवेगाव गडचिरोली, 55 वर्षीय पुरुष विवेकानंद नगर गडचिरोली, 73 वर्षीय पुरुष सर्वोदय वार्ड गडचिरोली, 53 वर्षीय पुरुष आरमोरी, 75 वर्षीय पुरुष गडचिरोली, 65 वर्षीय पुरुष वनश्री कॉलोनी नवेगाव गडचिरोली,65 वर्षीय पुरुष कुरुड ता.वडसा यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.47 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 18.51 टक्के तर मृत्यू दर 2.02 टक्के झाला.

नवीन 516 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 177, अहेरी तालुक्यातील 58, आरमोरी 30, भामरागड तालुक्यातील 7, चामोर्शी तालुक्यातील 42, धानोरा तालुक्यातील 26, एटापल्ली तालुक्यातील 36, कोरची तालुक्यातील 9, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 31, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 22, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 19 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 59 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 627 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 222, अहेरी 66,  आरमोरी 45, भामरागड 18, चामोर्शी 61, धानोरा 04, एटापल्ली 26, मुलचेरा 10, सिरोंचा 26, कोरची 38, कुरखेडा 21, तसेच वडसा येथील 90 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.