Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

श्रीराम मंदिर निर्माणातुन रामराज्य साकारेल : संभाजी भिडे

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मंगरुळनाथ, 9 जानेवारी:- राम मंदिराचा पाचशे वर्षाचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर आज तुमच्या आमच्या भाग्याने प्रभु श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर साकारणार असून, राम जन्मभूमी निधी संकलन व ग्राम संपर्क अभियानात समस्त राष्ट्र भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संभाजी भिडे गुरुजी यांनी केले ते अभियानाच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

जयंतीलाल सुखाडिया यांची नवीन वास्तु उपलब्ध करुन देण्यात आली. सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते प्रभु श्रीरामचंद्रांच्या मुर्तिचे पुजन करण्यात आले. त्या प्रसंगी नारायण महाराज शिंदे म्हणाले की प्रभू श्रीराम मंदीराचे अनेक वर्षापासुनचे रखडलेले निर्माण कार्य करण्यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक घरी जावुन संपर्क करा.त्यांचे सहकार्य मंदीर निर्माण कार्यात असु द्या, प्रत्येकाला वाटले पाहीजे की श्रीराम मंदीर हे माझे आहे.त्याठी माझाही हातभार लागला आहे.तरी सर्व श्रीराम भक्तांनी तन व मनाने कार्याला लागावे, असे ते भाषणातुन उदघाटन प्रसंगी बोलत होते.याप्रसंगी ते म्हणाले की प्रत्येक घरात रामाच्या प्रतिमेचे पूजन व्हावे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा


आयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदीर निर्माणाला सुरुवात झाल्याचे निमित्ताने श्रीराम जन्मभूमी निधी संकलन व ग्रामसंपर्क अभियाण कार्यालयाचे उदघाटन राममय वातावरणात विश्‍वहिंदु परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक मंडळ उच्चअधिकार समिती चे सदस्य नारायण महाराज शिंदे (खर्चीकर) यांचे विशेष उपस्थिीतीत येथील जेष्ठ कारसेवक तथा केशव गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष मिश्रीलाल बजाज यांचे अध्यक्षतेत ज्योतिष्य विषारद डॉ. सिद्ध अभेदनाथ, संजय मिसाळ, जयंतीलाल सुखाडिया, डॉ. रत्नपारखी, प्रा. विरेंद्रसिंह ठाकुर, प्रा. हरीदास ठाकरे, किशोर घोडचर यांचे उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक व संचालन विहिपचे जिल्हामंत्री सतिश हिवरकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.सुनिल सपकाळ यांनी केले.कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, भाजपाचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.