Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनच्या बांधकामाची मा. खा.अशोक नेते यांच्याकडून पाहणी

रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास जात असल्याचा आनंद.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 06 ऑगस्ट- मागील दहा-पंधरा दिवसापासून आलेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टी होऊन आलेल्या पावसाच्या पुरामुळे वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनचे बांधकाम खोळंबले होते.पण आता पाऊस ओसरल्याने रेल्वे लाईनच्या कामाला गती वाढविण्यासाठी दिं.०६ ऑगस्ट रोज मंगळवारी अडपल्ली- गोगांव या ठिकाणच्या रेल्वे लाईनच्या कामाची पाहणी अशोक नेते यांनी केली.तसेच गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेमार्गाचे जाळेविस्तारण्यासाठी पुढाकार घेणारे माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोक नेते यांनी वडसा-गडचिरोली या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाच्या कामाला भेट देऊन या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी सदर कामात असलेल्या काही अडचणी दूर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली.तसेच रेल्वेचा महत्त्वाकांशी प्रोजेक्ट पूर्णत्वास जात असल्याचा पाहून आनंद व समाधान व्यक्त केले. यावेळी सोबत रेल्वेचे वरिष्ठ खंड अभियंता आर.पी.सिंग,मॅनेजर अरुणजी जैन,चंद्रकांत सराटे, भाजपा नेते दत्तुजी माकोडे उपस्थित होते.

Comments are closed.