Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात कोरोनाची नवी नियमावली लागू; दुकानं फक्त सकाळी ७ ते ११ च्या वेळेत राहणार सुरु

  • त्यानंतर लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व दुकाने बंद ठेवावी लागतील.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २० एप्रिल: कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. साथीचे रोग कायदा १८९७ च्या कलम दोन, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार सदर बदल करण्यात येत असल्याची माहिती पत्रकाद्वारे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे. हे बदल खालीलप्रमाणे असतील व २० एप्रिल २०२१ संध्याकाळी आठ वाजेपासून ते मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत अस्तित्वात राहील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

  • सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांचे दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी सह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तीक व संघटनात्मक) सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत उघडे राहतील.
  • · वरील नमूद दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 पर्यंत मुभा असेल, परंतु आवश्यक वाटल्यास स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये फेरबदल करू शकते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  • · स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला वाटल्यास कलम दोन अंतर्गत काही गोष्टींना व सेवांना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकते.

· या आदेशामध्ये नमूद केलेल्या गोष्टीं व्यतिरिक्त इतर सर्व अटी व नियम 13 एप्रिल 2021 रोजी राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसारच असतील.

नव्या नियमानुसार किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु राहणार असली तरी होम डिलिव्हरी करण्यासाठी रात्री आठपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक फोनवरुन संपर्क साधून रात्री आठपर्यंत दुकानातून सामान घरी मागवू शकतात. तसेच नव्या नियमांनुसार रेशनिंगच्या दुकानांवरही ७ ते ११ ची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

नवे नियम काय असणार?

किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री, दूध विक्री दुकान (डेअरी), चिकन, मटण, मासे विक्री, खासगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्याची विक्री करणारी दुकानं सकाळी ७ ते ११ याच वेळेत खुली राहतील.

नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळं, आठवडी बाजार, दारुची दुकानं, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील.

Comments are closed.