Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवसेना खासदार संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते नसून शरद पवार यांचे प्रवक्ते झाले आहे – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. २७ मार्च: खासदार संजय राऊत हे आता शिवसेनेचे प्रवक्ते किंवा खासदार राहिलेले नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रवक्ते झाले. अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज नागपूरात पत्रकारांशी बोलत होते.  

शिवसेना ही UPA ची सदस्य नाही. जेव्हा शिवसेना UPA ची सदस्यच नाही तर त्या पद्धतीचे वक्तव्य करण्याचा अधिकार त्यांना नाही. असं आमचं मत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. पण तरीसुद्धा खा. संजय राऊत हे बोलत असून त्यांच्याबद्दल फार काही बोलावसं वाटत नसल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी परस्पर भेटून याविषयी स्पष्टता त्यांचा समोर मांडू असेही त्यांनी यावेळी सांगितले. आमच्या नेत्याबद्दल कुणी बोलत असेल तर ते आम्हाला मान्य नाही असेही नाना पटोले यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.