Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चक्रीवादळ,अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत ; घरावर झाड कोसळले

अहेरी उपविभागात बसला चक्रीवादळाचा तडाखा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी दि,७ एप्रिल : अहेरी तालुक्यातील  पेरमिली परिसरात गुरुवारी (६ एप्रिल) दुपारी ३.३० ते ४.४५ वाजता  दरम्यान  अचानक झालेल्या चक्रीवादळासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने एकच ताराम्बळ उडाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अचानक आलेल्या पाऊस,चक्रीवादळामुळे गावातील जनजीवन अस्तव्यस्त झाले असून  झाड कोसळल्याने २५ घरांचा वीज पुरवठा खंडित झाला .तर दुसरीकडे चक्रीवादळाने घरांवरील छत उडाले तर पेरमिली गावातील संजय सडमेक यांच्या राहत्या घरात ताडीचे झाड कोसळल्याने घरावरील कौले, पत्रे वादळात दूरवर उडून मोडून पडले. तर, काही ठिकाणी मोठी झाडे जमिनीवर कोसळली. यामुळे वीजतारा तुटल्या व वीजपुरवठा खंडित झाला.

सोबतच गावातील वसंत तोरेम यांच्या घरावरील पत्रे व कौले तुटली. गोठ्यावरही झाड कोसळल्याने गोठ्याचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त घरांचे तत्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी पेरमिली येथील नागरिकांनी केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा ,

https://youtube.com/live/Jxr1PGWIEb4?feature=share

अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली यांना खबरदारी

मुल शहरातील इतिहासात प्रथमच रंगणार राज्यस्तरीय कुस्ती सामन्यांचा थरार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.