Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भानामतीच्या संशयावरून दलित महिला – वृद्धाना दोरीने बांधून मारहाण

चंद्रपुरात मानुसकी कलंकित करणारी घडली घटना.संपूर्ण गाव बनले मूक साक्षीदार. सात जन जख्मी...जखमिंचा रुग्णालयात उपचार सुरु.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

 चंद्रपूर २३ ऑगस्ट: चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती या तालुक्याच्या ठिकाणावरून १२ किमी अंतरावरील दुर्गम भागात असलेल्या  वणी खुर्द या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला , वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली . या घटनेत ७ जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे . अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला कलंकित करणारी ही घटना घडली .

 

याची माहिती पोलिसांना होताच पोलिस घटना स्थळी दाखल झाली .पोलिसांनी काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी घटनेबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे . त्यामुळे चोवीस तास उलटूनही या गंभीर प्रकाराची कुठेही वाच्यता झाली नाही . किती लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला . कुणाला अटक करण्यात आली का , याबाबत काहीही माहिती देण्यास स्थानिक पोलिसांनी नकार दिला . मारहाण झालेले कुटुंब दलित असले तरी मारहाण करणाऱ्यांमध्ये सर्वजातीय सहभाग असल्याचे बोलले जाते . या घटनेची माहिती झाल्यानंतर   गावाबाहेर पोलिसांचा चोखबंदोबस्त आहे, सद्या स्थिति शांति पूर्वक असून , गावात कोणाला ही जाऊ देत् नसल्याची माहिती आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.