Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आष्टीच्या मुख्य रस्त्यावरील ‘आंबेडकर चौकात धोकादायक खड्डा

अपघाताला देत आहे आमंत्रण मात्र प्रशासनाचा कानाडोळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील आंबेडकर चौकातून आलापल्ली जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे तयार झाले असूनही प्रशासनाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

आलापल्ली-चंद्रपूर या मार्गावर दिवसभर भरधाव वेगाने वाहने धावत असतात. या  मार्गावरून  जाताना सिमेंट रस्ता संपल्यानंतर व जोशी यांच्या दुकानाजवळ मोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्यातून चारचाकी वाहने गेल्यानंतर प्रचंड धूळ उडत असून या धुळीमुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांत सिमेट काँक्रीट टाकून कायमचा बंदोबस्त करणार  का नाही ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दोन ठिकाणी पडलेल्या खड्यांतून  वाहन गेल्यानंतर प्रचंड धुरळा उडतो. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनधारकांच्या डोळ्यांत हे धुळीचे कण जात असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डोळ्यांत गेलेल्या धुळीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवसभर चारचाकी वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे दिवसभर मातीचा धुराळा उडत असतो. आंबेडकर चौकात असणाऱ्या दुकानदारांच्या मालावर धूळ साचत आहे. त्यामुळे दुकानदार त्रासून गेले आहेत. धुळीमुळे नागरिकांना विविध आजारांचा त्रास व्हायला लागलेला आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे सुरू असल्याचे नागरिक आता रोष व्यक्त करीत आहेत. कित्येकदा या खड्ड्यांत राडारोडा भरून तात्पुरती दुरुस्ती केली जाते; मात्र दिवसभर ट्रकच्या वाहतुकीने पुन्हा तो खड्डा तयार होत आहे. तेव्हा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्या दोन्ही खड्ड्यांत काँक्रीट टाकून कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हे ही वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.