Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कढोली गावात दारूविक्री बंदीचा निर्णय

पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत गाव सभा

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील महत्वाचे व मोठे गाव म्हणून परिचित असलेल्या कढोली येथे आयोजित गाव सभेमध्ये अवैध दारूविक्रीच्या मुद्द्यावर चर्चा करून गावातील शांतता टिकवून ठेवण्यासाठी एकमताने दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे. सभेला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवून निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कढोली गावात अवैध दारूविक्री बंदीसाठी गावातील महिलांनी पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबविले होते. यातून काही प्रमाणात व्यसनाचे प्रमाण देखील कमी झाले होते. यासाठी मुक्तिपथ तालुका चमूने वेळोवेळी गावात भेटी देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. आता गावात पुन्हा काही दारूविक्रेते सक्रिय झाल्याने युवकांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे. गावात भांडण- तंट्यांचे प्रमाण वाढून गावातील शांततेला धोका निर्माण झाला होता. अशातच गावामध्ये मुक्तिपथ व गाव संघटनेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले. ही सभा पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत व सरपंच पारिका रंदिये यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  यावेळी गावातील महिलांनी अवैध दारूविक्रीच्या मुद्द्यावर चर्चा करून आपल्या गावातून अवैध दारूविक्री हद्दपार करण्यासाठी दारूबंदीचा निर्णय घेतला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यानंतर मुक्तीपथ तर्फे तालुका प्रभारी शारदा मेश्राम यांनी दारू एक समस्या या विषयावर मार्गदर्शन केले व सर्व महिला भगिनींना, युवकांना, गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना दारूबंदी चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, उपसरपंच किरण आकरे  व सरपंच पारिका रांदिये यांनी ग्रामपंचायत तर्फे मिळणारे दाखले कागदपत्र व कोणत्या शासकीय योजनांचा लाभ दारूविक्रेत्यांना मिळणार नाही असे जाहीर केले. दारू विक्री करणाऱ्यावर 50 हजार रुपये दंड व स्त्रियाला शिवीगाळ करणाऱ्यांना सुद्धा दंड तसेच दारू पकडून देणाऱ्यांना  5 हजार रुपये बक्षीस असे सभेमध्ये जाहीर करण्यात आले.
यावेळी पोलीस विभागातर्फे पोलिस उपनिरीक्षक भोंबे, बीट जमादार शेखर मडावी,  पोलीस पाटील राजेंद्र आकरे, तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर लोणबले , पंढरी रंदये, निकेश बागडे, दिलीप गायकवाड, चंद्रकांत चौके ग्रामपंचायत सदस्य, सोनू जीतकुंटलवार, गीता जनबंधू, ममता सहारे, महानंदा तलमले, सुनिता मानकर, विजया जनबंधू, मीनाक्षी ढवळे, मैनाबाई मानकर, कल्पना गावतुरे, सुनिता दडमल, किरण चौधरी, किरण ढवळे, स्मिता ढवळे, विमल जनबंधू, मुक्तीपत तर्फे तालुका प्रभारी शारदा मेश्राम व तालुका प्रेरक जीवन दहीकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.