Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचे उदघाटन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अकोला 7 ऑक्टोबर :- अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक नूतन कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फिt कापून करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री यांनी पोलीस विभागाला शुभेच्छा दिल्यात. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्त्वाचे कार्य पोलीस विभाग करीत असतो त्यामुळे ही वास्तू निश्चितच कायदा व स्वस्त साठी अखंड कार्यरत राहील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गेल्या काही वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालचे उपमुख्यमंत्री तसेच अकोला जिल्ह्याचे पालक मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात सम्पन्न झाले. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयचे आज पासून नवीन जागेत स्थानंतर झाले असून आता प्राथमिक कामकाजाला सदर ठिकाणाहून सुरुवात करण्यात येणार आहे. आज पार पडलेल्या पोलीस मुख्याल्याच्या उदघाट्न प्रसंगी लोकप्रतिनिधी सह रजनीश सेठ पोलीस महासंचालक,आनंद लिमये, राज्य अपर मुख्य सचिव, संजय वर्मा, चंद्रकिशोर मिणा पोलीस उपमहानिरीक्षक अमरावती परीक्षेत्र अमरावती यांची उपस्थिती लाभली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.