Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देसाईगंज पोलीसांनी जप्त केला प्रतिबंधित सुगंधीत तंबाखु जप्त

एकुण 33,50,480/- किंमतीच्या मुद्देमालासह दोन आरोपी जेरबंद.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 11 सप्टेंबर :आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आज दिनांक 11/09/2023 रोजी अवैद्यरित्या प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची वाहतुक होणार आहे. अशी खबर पोअं/5538 ढोके पोस्टे देसाईगंज यांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक रासकर पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार राऊत, ढोके सराटे,कुमोटी असे सापळा रचुन आरोपी आशिष अशोक मुळे, वय 30 वर्ष, रा. खरबी, पोस्टे खेड, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपुर, अतुल देविदास सिंधीमेश्राम, वय – 29 वर्ष, रा. भवानी वार्ड ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपुर यास पकडले व त्याचे ताब्यातुन  लाल रंगाची टाटा कंपनीची आयशर वाहन क्र. एमएच 40 सिएम 6552 कि. अंदाजे. 10,000/- रुपये आणि 24 नग मोठ्या पांढ­या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुगळीमध्ये प्रत्येकी 6 नग पांढ­या रंगाचे कट्टे व त्या प्रत्येक कटयामध्ये 11 नग पॅकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहिलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत 640 रुपये असे एकुण 10, 13,760/- रुपये तसेच 21 नग मोठ्या हिरव्या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येकी 4 नग पांढ­या रंगाचे कट्टे व प्रत्येक कट्टयामध्ये 44 नग पॉकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहिलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत 3,100/- रुपये असे एकुण 11, 45,760/- रुपये.

14 नग लहान पांढ­या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येक कटयामध्ये 44 नग पॉकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहीलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत 310 रुपये असे एकुण 1,90,960/- रुपये असा एकुण 33, 50, 480/- रुपय किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर बाबत अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांना माहिती देण्यात आली तसेच पो.स्टे. देसाईगंज येथे अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांचे फिर्यादी वरुन गुन्हा नोंद करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्हयात अवैध सुगंधीत तंबाखु तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी  पोलीस अधीक्षक नीलोत्पल  यांनी कठोर कार्यवाहीचे निर्देश सर्व अधिकारी यांना दिले आहेत. सदर ही  कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर, यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक  किरण रासकर यांचे नेतृत्वाखाली पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोअं/दिनेश राऊत, नरेश कुमोटी, विलेश ढोके व संतोष सराटे यांनी पार पाडली आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.