Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांची गडचिरोलीतील अतिसंवेदनशिल वांगेतुरी व पोमकें गर्देवाडा ला भेट

प्राणहिता (अहेरी) येथे सी-60 जवानांचे मनोबल उंचावत मा. पोलीस महासंचालक साो. यांनी जवानांशी साधला संवाद.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 17 फेब्रुवारी – महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी शनिवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी गडचिरोली पोलीस दलास भेट दिली. यावेळी पोलीस महासंचालक यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथील शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहीली व शौर्यस्थळास भेट दिली. त्यानंतर माहे नोव्हेंबर 2023 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या पोस्टे वांगेतुरी येथे भेट देऊन पोस्टे वांगेतुरी येथील कामकाजाची पाहणी केली व उपस्थित अधिकारी व अंमलदार यांच्याशी संवाद साधला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हेडरी अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या पोमकें गर्देवाडा येथे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन आयोजित केलेल्या महाजनजागरण मेळाव्यात  पोलीस महासंचालक  यांचे हस्ते महाजनजागरण मेळाव्यात हजर नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड व इतर शासकिय कागदपत्रे, स्प्रे पंप, स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी, मच्छरदानी, ब्लॅकेट, लोवर-टीशर्ट, मोठे बल्ब, महिलांना साड्या व चप्पल, तसेच शालेय विद्यार्थ्यांना सायकल, पेन, नोटबुक, क्रिकेट किट, व्हॉलीबॉल व नेट, कपडे, कंपॉस, चॉकलेट, बिस्कीट इ. साहित्यांचे वाटप करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधतांना पोलीस महासंचालक यांनी सांगितले की, शिक्षणाच्या जोरावर आदिवासी समाजातील महिला या देशाच्या राष्ट्रपती पदी देखील येऊ शकतात. आजपर्यंत माओवाद्यांच्या प्रभावामुळे हा परिसर विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिला होता. परंतू आता नवीन पोलीस मदत केंद्राच्या स्थापनेमुळे येथील नागरिक भयमुक्त होऊन विकासाच्या प्रवाहात येतील. पोलीस दादालोरा खिडकी सारख्या उपक्रमातून दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात येथील आदिवासी बांधवांच्या मदतीनेच आम्ही माओवाद संपवू तसेच गडचिरोली जिल्हयाच्या विकासासाठी शासन कटिबध्द असुन, जनतेने माओवाद्यांच्या भुलथापांना बळी पडु नये असे ते मानले.

त्यानंतर पोलीस महासंचालक यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पोमकें सुरजागड येथील पोलीस अंमलदार निवासस्थानाचे व पोलीस अंमलदार भोजन कक्षाचा उदघाटन समारंभ पार पाडला. त्यानंतर पोलीस महासंचालक यांनी उपमुख्यालय प्राणहिता येथे भेट देऊन सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार यांचा दरबार घेऊन उपस्थित सर्व अधिकारी/अंमलदार यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, त्यांना गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 पथकाचा अभिमान असून, सी-60 पथकातील जवानांनी माओवादाविरुद्धच्या शिल्लक असलेल्या शेवटच्या लढाईवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.

त्यानंतर  पोलीस महासंचालक  व इतर मान्यवर यांनी सी.टी.सी. किटाळी येथे भेट दिली व त्यांच्या हस्ते सी.टी.सी. किटाळी येथील प्रशिक्षणार्थी बॅरेक, टॅक्टीकल फायरिंग रेंज कंट्रोल रुम व फायरबट क्र. 01 चे नुतनीकरण उद्घाटन समारंभ पार पाडला. उद्घाटनानंतर पोलीस महासंचालक यांनी बिडीडीएस (बॉम्ब शोधक व नाशक पथक) सह माओवादविरोधी अभियानामध्ये गडचिरोली पोलीस दलाकडुन वापरलेल्या शस्त्रास्त्रे, ड्रोन व विविध प्रकारच्या युद्धनिती बाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती घेतली.

महाजनजागरण मेळाव्यात पोलीस महासंचालक व आयुक्त,राज्य गुप्तवार्ता विभाग, म.रा. मुंबई शिरीष जैन, विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान नागपूर, संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल यांच्या प्रमुख उपस्थित होते.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.