Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सेवा पंधरवाड्यात महसूल मंत्र्यांकडून थेट दखल : तक्रारींचे जागेवर निवारण….

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य अभियानांतर्गत सुरू असलेल्या सेवा पंधरवाडा उपक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून तत्काळ निवारणाचे आदेश दिले. मोठ्या संख्येने आलेल्या निवेदनांवर संबंधित विभागांना त्वरीत कारवाईची स्पष्ट सूचना देत काही प्रकरणे जागेवरच निकाली काढण्यात आली.

९० दिवसांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या एका तक्रारीची दखल घेत बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यावर विभागीय चौकशीसह वेतनवाढ रोखण्याची शिफारस करण्याचा इशारा दिला. “अधिकाऱ्यांनी वेळेत काम केले असते तर नागरिकांना इतक्या मोठ्या प्रमाणात इथे यावे लागले नसते,” असा सजगतेचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या बैठकीस जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, संजय आसवले यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

रेती माफियांवर होणार ‘एमपीडीए’ची कारवाई

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रेती चोरी करणाऱ्या माफियांवर आता पोलीस आणि महसूल या दोन्ही विभागांकडून कारवाई केली जाईल. एवढेच नाही तर वारंवार रेती चोरीच्या प्रकरणात सापडणाऱ्यांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज गडचिरोलीत माध्यमांशी बोलताना दिली.

गोपीचंद पडळकरांचे वक्तव्य मान्य नाही- बावनकुळे

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या आई-वडिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. असे वक्तव्य आम्हाला मान्य नाही. पुन्हा त्यांनी या पद्धतीचे वक्तव्य करू नये यासाठी त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती म्हणूनच लढणार

येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीमधील घटक पक्ष सोबतच लढतील आणि 51 टक्के मतं घेतील, असा विश्वास भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. स्थानिक पातळीवर कुठे एकमत झाले नाही तर मैत्रीपूर्ण लढती होतील. मात्र महायुतीला तडा जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.