Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अन्नधान्याचे वाटप

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. 07 जुलै : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत माहे जुलै 2021 करीता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू व तांदूळाचे नियतन व वाटप परिमाण जिल्ह्यातील सर्व रेशनकार्ड धारकांसाठी निश्चित करण्यात आलेले आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिका 25 किलो तांदुळ, गहू 10 किलो व साखर 1 प्रति किलो प्रमाणे तांदुळ 3 रु., गहू 2 रु. तर साखर 20 रु.प्रति किलो प्रमाणे असेल. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रती व्यक्ती 3 किलो तांदुळ, 2 किलो गहू प्रमाणे मिळणार असून तांदुळ प्रति किलो 3 रु.प्रमाणे व गहू 2 रु प्रति किलो प्रमाणे मिळणार आहे.

कोरोना संसर्ग प्रादुर्भावात आलेल्या आर्थिक व्यत्ययामुळे गरीबांना सामोरे जावे लागत असलेल्या कठीण प्रसंगाच्या पार्श्वभुमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लक्ष्य निर्धारित केले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गडचिरोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त माहे जुलै 2021 ते नोव्हेंबर 2021 या महिन्यासाठी धान्य वाटप केले जाणार आहे. अंत्योदय अन्न योजनेचे व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेचे प्रतिव्यक्ती 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ परिमाणानुसार प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) मोफत वाटप करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हयातील सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी, त्यांना नेमून दिलेल्या स्वस्त धान्य दुकानात जावून आपले शिधापत्रिकेवार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील माहे जुलै 2021 महिन्यातील नियमित देय असलेल्या संपूर्ण अन्नधान्याची उचल करावी. व धान्य घेतेवळी पॉझ मशीन मधून निघणारे बिल घेवून बिल पावतीवर नमूद असलेली रक्कम देण्यात यावी. व सोबतच नियमित अन्नधान्य व्यतिरिक्त माहे जुलै 2021 महिन्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील देय असलेल्या संपूर्ण अन्नधान्याची मोफत उचल करावी. दुकानात एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे.

मासिक केरोसीन निर्धारित वाटपाचे परिमाण – गॅस नसल्याचे हमीपत्र सादर केलेल्या शिधापत्रिक धारकांसाठी शिधापत्रिकेवरील व्यक्तीची संख्या, एक व्यक्तीला अनुज्ञेय दोन लिटर, दोन व्यक्ती यांना तीन लिटर तर तीन व्यक्ती वा त्याहून अधिक व्यक्ती यांना चार लिटर केरोसिन मिळणार आहे असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

एकतर मानधनवाढ तात्काळ लागू करा किंवा आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या; मानसेवी डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आत्महत्येची परवानगी

गडचिरोली जिल्ह्यात आज 8 कोरोनामुक्त तर 12 नवीन कोरोना बाधितांची नोंद

चंद्रपूर जिल्ह्यात येत्या १० जुलै ला भूजल पुनर्भरण विषयावर तांत्रिक मार्गदर्शन

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.