Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भामरागड मधील दुर्गम भागात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी साधला गावकऱ्यांशी संवाद

Get real time updates directly on you device, subscribe now.

पल्ली गावातील सेंद्रीय शेतीलाही दिली भेट

गडचिरोली, दि. २४ जानेवारी : जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी भामरागड तालुक्यातील दुर्गम गावांना भेटी देवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पारंपारिक पध्दतीने वर्षानो वर्षे सेंद्रिय शेती करत असलेल्या पल्ली गावाला भेट दिली. तसेच त्यांनी आपल्या दौऱ्यात लाहेरी, होड्री, कुमारगुडा व गुंडेनूर येथील गावांना भेटी दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या भेटीत पल्ली आणि होड्री गावात बसून पारंपारिक पध्दतीच्या जेवणाचा आस्वादही त्यांनी घेतला. पल्ली गावात ताडगाव-पल्लीला जोडणाऱ्या कच्या मार्गावरील पूल बांधण्यासाठी नियोजन करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले व संबंधितांना याबाबत सूचना केल्या. गावात गावकऱ्यांशी बसून समस्या सोडविण्याबाबत यावेळी त्यांनी चर्चा केली. पल्ली गावातील सेंद्रिय शेतीला प्रमाणपत्र देणेबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. जेणेकरून या शेतीबाबत सर्वदूर जागूरकता व संबंधित शेतकऱ्यांना फायदा होईल. त्या गावातील सेंद्रिय शेतीमध्ये जशी वाढ होत आहे तशी वाढ इतर गावांमध्ये करणेबाबत त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पल्ली गावात तलाव बांधणे साठी त्यांनी मार्गदर्शन केले यामुळे सेंद्रिय शेतीला मुबलक पाण्याची व्यवस्था होईल असे ते यावेळी म्हणाले. प्रकल्प कार्यालयामार्फत सेंद्रिय भाजीपाला विक्रीसाठी गाडी मंजूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी विभागाला दिले. यातून सेंद्रीस माल विकण्यास मदत होणार आहे. त्यानंतर त्यांनी कुमरगुडा येथील प्रस्तावित आदिवासी जतन केंद्राची पाहणीही आपल्या भामरागड दौऱ्यात केली.

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत भामरागड नगरपंचायत मध्ये विविध व्यवस्थेची पाहणी व आपत्ती विभागातील बोटीमधून नौका विहार करून दरवर्षी होणाऱ्या पूरस्थिती बाबतची पाहणी जिल्हाधिकारी यांनी भामरागड येथे केली. नगरपंचायतध्ये नव्याने आलेल्या घनकचरा गाडयांचे लोकार्पण केले. तसेच व्यायाम शाळा लोकर्पण, नव्याने झालेल्या घनकचरा डेपोचे भूमिपूजन त्यांनी केले. भामरागड येथील त्रिवेणी संगमावर भेट देवून तेथील सुधारणांबाबत आरएफओ बरोबर चर्चा केली व आराखडा तयार करणेबाबत सूचना केल्या. याचवेळी भामरागड मधील सर्व विभाग प्रमुखांबरोबर विकासात्मक कामांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी तालुक्याच्या समस्या जाणून घेतल्या व विकासावर आधारीत कामांचे नियोजन करण्यास उपस्थितांना सूचना केल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दुर्गम भागात पारंपारिक पध्दतीने स्वागत : या भेटीत लाहेरी भागातील विविध गावांना भेटी दिल्या. भुसेवाडा गावाला जोडणाऱ्या बेली ब्रीजचीही पाहणी केली. गुंडेनूर नाल्याची पाहणी करून त्या ठिकाणी पूल बांधकामाबाबत संबंधितांना पाहणी व सर्वेक्षण करणेबाबत निर्देश दिले. याच नाल्यामूळे काही महिन्यांपुर्वी पावसाळयात गरोदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तिच्या घरी भेट देवून कुटुंबियांचे सांत्वन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. तसेच गुंडेनूर अंगणवाडीत भेट देवून तेथील मुलांशी संवादही साधला. त्यानंतर होड्री गावातील बेली ब्रीजच्या कामाला भेट देवून कामाची पाहणी केली.

होड्री गावात त्याठिकाणी आदिवासी नागरिकांनी पारंपारिक आदिवासी पध्दतीने जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले. त्याठिकाणी गावात रेला नृत्यही सादर करण्यात आले. त्यावेळी गावात झालेल्या सभेत जिल्हाधिकारी यांनी गावातील समस्या जाणून घेतल्या व गावातील रस्ते तातडीने ठक्कर बाप्पा योजनेतून करणेबाबत आदेश दिले, तसेच पाणंद रस्तेही रोहोयोमधून पूर्ण करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले. या गावात गावातील नागरिकांबरोबर बसून कोसरी पासून बनविलेले जेवणही जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. या भेटीवेळी तहसिलदार अनमोल कांबळे, उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे, मुख्याधिकारी नगरपंचायत सूरज जाधव, आरएफओ विशाल चव्हाण, नायब तहसिलदार, आरोग्य विभागातील अधिकारी, गट विकास आधिकारी, पल्लीचे तलाठी कोतवाल, लाहेरीचे तलाठी व परिसरातील सर्व कोतवाल उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.