Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

१८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे लसींचा साठा आहे का; पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सातारा, दि. २८ एप्रिल: देशात अद्याप ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले नसताना केंद्र सरकारने १८ वर्षांवरील लोकांना लस देण्याची घोषणा केली आहे. अगोदरच लसींचा तुटवडा असताना आता १८ वर्षांवरील नागरिकांना लस कुठून देणार, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण बुधवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. भारत देशात १४० कोटी लोकसंख्या असून सध्या ४५ वयोगटाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण अजुन पुर्ण झाले नसुन तरीदेखील 18 वर्षावरील सर्वांना लसीची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. तेवढी लस भारतात आहे का, याचचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अन्यथा १ मे नंतर गर्दी झाली तर हे दुर्दैव म्हणावे लागेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

‘केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत’

ऑक्टोबर २०२० मध्येच १ लाख टन वैद्यकीय ऑक्सीजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे असेदेखील सांगितले होते. अशा या फाजील आत्मविश्वासामुळे आज देश गंभीर संकटात असून मोदी सरकारने केलेल्या या अक्षम्य चुकांची आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयांमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.