Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘अन्नसुरक्षा’ मधून लालबत्ती परिसरातील गरजूंना अन्नदान

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • लहान मुलांना दूधवाटप; ‘डिक्काई’, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शहा परिवाराचा संयुक्त उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे, दि. २१ एप्रिल: दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज पुणे व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे, उद्योजक दानेश शहा परिवार यांच्यातर्फे अन्नसुरक्षा विमा (फूड इन्शुरन्स) योजने अंतर्गत प्रायोगिक तत्वावर कोरोना महामारीच्या काळात दिव्यांग, गरीब व गरजू व्यक्तींना फूड पॅकेट्स, रोगप्रतिकार शक्तीवर्धक औषधे, मास्क आदी जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून बुधवार पेठेतील देवदासी वस्ती परिसरातील गरजूंना शुक्रवार पेठ पोलीस चौकीजवळ दुध वाटप, तसेच अन्नदान (फूड पॅकेट्स) करण्यात आले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. गजानन एकबोटे, नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे व रघुनाथ येमुल गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमास गुन्हे शाखेच्या अपर पोलीस अधीक्षक वैशाली माने, पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील, दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्काई) पुणेचे प्रमुख अध्यात्मिक गुरू रघुनाथ येमूल, उद्योजक दानेश शहा, कृपा शहा, अवनी फाउंडेशनच्या प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, ‘डिक्काई’चे विश्वनाथ घोणे, पालिकेतील सामाजिक विकास समन्वयिका अलका गुजनाळ, हृषीकेश कोंढाळकर, सुरज दरेकर, संदीप शिरोळे, आशिष चव्हाण, अविनाश बने, निलेश काची, संपदा जोशी, प्रफुल्ल रोकडे यांच्यासह मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट व शुक्रवार पेठ पोलीस चौकीतील स्टाफ उपस्थित होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रघुनाथ येमूल म्हणाले, “कृपा शहा यांच्या वाढदिवसानिमित्त देवदासी वस्तीतील महिलांना व मुलांना दूध, अन्न, मास्क वाटप करण्यात आले. मानवतेवर आलेल्या या संकटकाळात दानशूरांनी पुढे येऊन गरीब व गरजूंसाठीच्या या अन्नदान सेवेत स्वयंसेवक म्हणून अथवा आर्थिक स्वरूपात मदत करावी. त्यातून अधिकाधिक लोकांना अन्नदान सेवा पुरविता येईल. या उपक्रमात फूड पॅकेट्सचे फिरत्या टेम्पोद्वारे स्वारगेट, भवानी पेठ, मॉडर्न कॉलेज रोड, शिवाजीनगर, हडपसर, अप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ, पर्वती, शुक्रवार पेठ आदी भागात वाटप केले जात आहे. तसेच फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना व्हिटॅमिनची गोळ्या-औषधे देण्यात येत आहेत.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.