Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंढेच्या अचानक भेटीमुळे आरोग्य यंत्रणेची उडाली झोप

तुकाराम मुंढे एक्शन मोड वर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बीड,  27 ऑक्टोबर :-  तुकाराम मुंढे यांनी आयुक्त आरोग्य सेवा तसेच संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा पदभार घेतल्यानंतर ते एक्शन मोड वर पहायला मिळत आहेत. डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ऐन दिवाळीमध्ये तुकाराम मुंढे मराठवाड्याचा दौरा करत असल्यामुळे आरोग्य कर्मचार्यांची झोप उडाली आहे. रूग्णालयात तुकाराम मुंढे ची अचानक एन्ट्री झाल्यामुळे रूग्णालय प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावेळी पाहणी दरम्यान गैरहजर असलेल्या कर्मचार्यांवर कार्रवाई करण्यास सुरूवात केली तर आरोग्य यंत्रणेला शिस्त लावण्यास ते व्हीसीद्वारे अधिकार्यांशी संवाद साधत आहे.

राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे हे बीड जिल्ह्यात आसलेल्या आपल्या स्वगावी दिवाळी निमित्त आले होते. मात्र कर्तव्यदक्षता दाखवत त्यांनी बीड जिल्हा रूग्णालयाला सायंकाळी अचानक भेट दिल्यामुळे आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली. यावेळी त्यांनी कामचोर अधिकारी, कर्मचारी आणि रेकार्ड व्यवस्थित न ठेवणार्या कर्मचार्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच वेगवेगळ्या वार्ड मध्ये जाउन त्यांनी रूग्णांची विचारपुस ही केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरोग्य कर्मचार्यांना धरले धारेवर

तुकाराम मुंढे हे अतिदक्षता विभागात गेले असता त्या ठिकाणी औषधींचे रेकार्ड आढळून आले नाही. यावेळी त्यांनी तेथील कर्मचार्यांना काम जमत नसेल तर नोकरी सोडून द्या अशा शब्दात धारेवर धरले. अचानक आलेल्या मुंढेमुळे रूग्णालय प्रशासनची मात्र चांगली धांदल उडाली. यावेळी अनेक डॉक्टरांना व्यक्स्थित उत्तर देखील देता आली नाही त्यामुळे देखील तुकाराम मुंढे चांगलेच संतापले. मुंढे आपल्या दौर्यात मराठवाड्यातील विविध रूग्णालयांना भेटी देउन पाहणी करणार आहेत. त्यामुळे कारवाईच्या भितीपोटी कर्मचारी रूग्णालयातच तळ ठोकून आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.