Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा -1 अंतर्गत पुर्ण घरकुलांचे ई-गृहप्रवेश १७ सप्टेंबर ला

टप्पा 2 अंतर्गत 14 हजार 951 घरकुलांना मंजुरी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : सन 2023-24 व 2024-25 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-1 अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांचे चावी वितरण व ई-गृहप्रवेशाचा प्रतिनिधिक स्वरूपातील कार्यक्रमाचे आयोजन १७ सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन सभागृह येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.

ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांनी सन 2024-25 या वर्षाकरिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -2 अंतर्गत गडचिरोली जिल्हयाकरिता 14 हजार 951 एवढे उदिदष्ट दिले आहे. याअंतर्गत दिनांक १७ सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता ऑनलाइन वितरित करण्यांत येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण जिल्हा नियोजन सभागृह येथे करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र भुयार यांनी केले आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.