Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नवाब मलिक याच्या संपत्ती जप्तीचे ईडीचे आदेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 05 नोव्हेंबर :- राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक याची संपत्ती जप्तीचे आदेश ईडी ने देउन मोठा दणका दिला आहे. यात मुंबईतील तीन फ्लॅट्स आणि धाराशिव मधील 147 एकर जमीनी का समावेश आहे. मनी लाॅंड्रिग प्रकरणात मलिकच्या मालमत्तेच्या संलग्गनेची पुष्टी झाल्यानंतर ईडीने हा आदेश दिला आहे.

नवाब मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेच्या तात्पुरत्या जप्तीची पुष्टी न्याया निर्णया प्राधिकरण ने नुकतीच केली. त्यात गोवाला कंपाउंडचा परिसर आणि कुर्ला पश्चिमेाल तीन फ्लॅट्स, वांद्र पश्चिमेाल दोन फ्लॅट्स आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 147 एकर शेतजमीनीचा समावेश आहे. ही संपत्ती ताब्यात घेण्याबाबत ईडीचे अधिकारी त्यांच्या कायदेशीर टीमशी चर्चा करत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गॅंगस्टर दाउद इब्राहिम यांची दिवंगत बहीण हसिना पारकर हिच्याशी संबंधित मनी लाॅंड्रिंग प्रकरणात ईडीने फेब्रुवारीमध्ये मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ईडीने मलिक कुटूंबाची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. ही संपत्ती नवाब मलिक, त्यांचे कुटूंबीय, साॅलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट मिमिटेड आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधी आहेत. मलिक अजूनही न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.