Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“एक हात मदतीचा” उपक्रमातून चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य — सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांचा प्रेरणादायी पुढाकार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

“एक हात मदतीचा” हा केवळ सामाजिक उपक्रम नसून, तो गरजूंना आधार, शिक्षणाला चालना आणि समाजात ऐक्याची भावना रुजविणारा एक प्रेरणादायी प्रवास ठरत आहे.

गडचिरोली : “गरजवंताच्या हातात मदतीचा हात पोहोचविणे, हाच समाजसेवेचा खरा अर्थ आहे” या भावनेतून सुरु झालेल्या “एक हात मदतीचा” या उपक्रमाने गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवनात आशेचा दीप प्रज्वलित केला आहे. माजी कॅबिनेट मंत्री आणि आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली, सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने आणि निष्ठेने राबवून हजारो नागरिकांचे जीवन समृद्ध केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या उपक्रमांतर्गत आतापर्यंत मोफत वैद्यकीय सेवा, आभा कार्ड व पॅन कार्ड वितरण, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रोजगार मार्गदर्शन केंद्राची स्थापना, तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण यांसारखे अनेक विधायक उपक्रम राबविण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगाराच्या वाटा खुल्या करून देण्यापासून ते चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यापर्यंत, या उपक्रमाने समाजाच्या सर्वच घटकांपर्यंत पोहोच साधली आहे.

याच परंपरेत पेटतडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तनुश्रीताई आत्राम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना, “आपल्याला कोणतीही अडचण भेडसावली, तर हक्काने मला फोन करा. ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत तुमची समस्या सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन” असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमाला शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक के. के. सोनटक्के, पी. डब्ल्यू. किरमे, आर. एस. वरभे, एन. एम. कन्नाके यांच्यासह प्रशांत गेडाम, प्रवीण गेडाम, रमेश कन्नाके, ओमप्रकाश बल्लारवार, सोनिका ताई तुकलवार, करीना ताई कोल्हेवार, शोभाताई कन्नाके, सावित्रीबाई पेंदाम, संजय नागुलवार, वनिता कोसरे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या उपक्रमाला प्रतिसाद दिला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.