Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रत्येक तालुक्यात स्टेडियम मंजूर करण्यास करणार प्रयत्न

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, सत्कार गुणवंतांचा व यशवंताचा कार्यक्रमाचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी, 29, ऑक्टोबर :-  तालुक्यातील खेळाडूमध्ये विविध खेळांमध्ये मोठी उंची गाठण्याची क्षमता आहे. परंतु विद्याथ्र्यांना शारीरिक सराव करण्यात मैदान उपलब्ध नसल्याने त्यांना सराव करण्यात अडचणी येतात. त्यामुळे मैदान विकसित करून प्रत्येक तालुक्यात स्टेडीयम मंजूर करण्यासाठी पाठपुराव करणार असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.  राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था आलापल्ली संचालित लक्ष्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अहेरी द्वारा ‘सत्कार गुणवंतांचा व यशवंताचा’ कार्यक्रम घेण्यात आला.  त्यावेळी ते कार्यक्रमाचे विशेष अतिथि म्हणून  बोलत होते.  प्रमुख पाहुने म्हणून कास्य पदक विजेते तहसीलदार ओंकार ओतारी, राष्ट्रीय धावपटू नम्रता ओतारी, प्राचार्य मंडल, प्राचार्य मेश्राम, प्राचार्य कोड़ेलवार, प्राचार्य भोंगड़े, नगरसेवक विकास उईके, शालिनी पोहनेकर, अमोल गुडेलीवार उपास्थित होते.

लक्ष्य एकेडमी चे 2017 पासुन तर 2022 पर्यंत शासनाच्या विविध क्षेत्रात नौकरी लागलेले विद्यार्थी गणेश देवकते, नेहा डोके, दानिश शेख, अंकित नल्लूरवार, स्वामी पसपुरवार, वसीम शेख, रवितेजा अलाम, सुमित येलपुरवार, निर्णय जांभुडे,  जोगा आत्राम, सूरज साखरे, शुभम शेंडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी लक्ष्य एकेडमी मार्फत घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत अव्वल अलेल्या तीन विद्याथ्र्यांना राजकीरण गुरनुले, अवनीत गव्हारे, गौतम झाड़े याना रोख रक्कम व पारितोषिक देऊंन सत्कार करण्यात आला. 25 शालेय विद्यार्थ्याना प्रोत्साहन पर पारितोषिक देन्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विद्यार्थना मार्गदर्शन करताना  तहसीलदार ओतारी यानी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुण यश कस प्राप्त करायच यावर मार्गदर्शन केले. नम्रता ओतारी यानी स्वत: मुलीना प्रशिक्षण दिले होते.  त्यासठी त्यानी सुद्धा येथिल विद्यार्थी क्षमता चांगली असुन नक्कीच पुढे जातील असे विधान केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने  विद्यार्थी, नागरिक, पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजर्षी शाहू महाराज संस्था अध्यक्ष गिरीश मद्देर्लावार, प्रस्तावित लक्ष्य एकेडमी चे सतीश पानकंठीवार, विनोद दहागावकर यानी आभार मानले.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.