Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उद्योजकांनीही हातभार लावून उत्तम खेळाडू घडविण्यासाठी योगदान द्यावा  – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर,  14 नोव्हेंबर :- आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी खेळाडुंना मार्गदर्शन करण्यासाठी उत्तम प्रशिक्षक आवश्यक असते तसेच उत्तम दर्जाचा आहार आवश्यक असतो. खेलो इंडियाच्या माध्यमातून या प्रशिक्षण केंद्रातून या सर्व बाबी पुरविल्या जातील. खेळाडू घडविण्यासाठी जिल्ह्यातील उद्योजकांनीही हातभार लावून उत्तम खेळाडू घडविण्यासाठी योगदान द्यावा असे  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालघर जिल्ह्याचे  पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.  खेलो इंडिया बॉक्सींग प्रशिक्षण केंद्रातील अद्यावत बॉक्सींग रिंगचे उद्घाटन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदही वाढाण, खासदार राजेंद्र गावित, पालघरच्या नगराध्यक्षा उज्वला काळे, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा क्रिडा अधिकारी सुहास व्हनमाने आणि मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

खेलो इंडिया या योजनेतून देशामध्ये 1 हजार खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यासाठी बॉक्सींग प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. या प्रशिक्षण केंद्रामधून दर्जेदार गुणवंत खेळाडू घडतील असा विश्वास पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके उपस्थित होते.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.