Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क, दि. १९ एप्रिल: प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे आज सोमवारी सकाळी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सुमित्रा भावे यांच्यावर पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लेखिका, पटकथा लेखक, निर्मात्या आणि दिग्दर्शक म्हणून त्या चित्रपटसृष्टीत परिचित होत्या. सुमित्रा यांनी आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले होते.

सुमित्रा भावे यांनी अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी १९८४ मध्ये लघुपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत कामाला सुरुवात केली. त्यांच्या चित्रपटसृष्टीच्या कारकिर्दीत १४ चित्रपट हे सुनील सुकथनकर यांच्यासोबत केले होते. दैनंदिन जीवनात येणारे अनुभव आणि सर्वसामान्य माणसांच्या गोष्टी त्यांनी चित्रपटातून मांडल्या. राष्ट्रीय पुरस्कारासह इतर पुरस्कारावंरही त्यांनी नाव कोरलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.