Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीतील अतिदुर्गम भागातील शेतकरी कृषीदर्शन व अभ्यास दौरा सहलीकरीता रवाना

आतापर्यंत पंधरा कृषी सहलीतून 693 शेतक­यांनी घेतला कृषी दर्शन सहलीचा लाभ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 05 सप्टेंबर – गडचिरोली जिल्ह्रातील शेतकरी पारंपरिक पध्दतीने शेती करीत आहेत. त्यामुळे शेती मधुन प्राप्त होणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने त्यांच्या आर्थिक विकासास अडथळा निर्माण होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास अडचण निर्माण होत आहे. जिल्ह्रातील शेतकरी जिल्ह्राबाहेर पडून, पारंपरिक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत अत्याधुनिक शेती करणा­या शेतक­यांच्या बांधावर जावुन तेथील परिस्थीतीची, आधुनिक शेती व उपकरणांची पाहणी करतील व त्या ज्ञानाचा वापर करून पारंपरिक शेती पध्दतीत बदल करतील व जिल्ह्रातील शेतक­यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे संकल्पनेतून गडचिरोली येथून एकुण 45 शेतक­यांकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांचे संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडाण अंतर्गत” सोळाव्या कृषीदर्शन व अभ्यास दौ­याचे आयोजन करण्यात आले आहे.

यापुर्वी झालेल्या एकुण पंधरा कृषी दर्शन सहल व अभ्यास दौ­यांमध्ये दुर्गम भागातील विविध उपविभागातून एकुण 693 महिला व पुरुष शेतक­यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या सोळाव्या सहलीमध्ये एटापल्ली, भामरागड व हेडरी उपविभागातील अतिदुर्गम भागातील 45 शेतक­यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या सहली दरम्यान सहभागी शेतकरी बडनेरा, अकोला, शेगाव, जळगाव, वेरुळ, राहुरी, पैठण, बारामती, पुणे, परभणी, यवतमाळ, वरोरा, घातखेड येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच विविध शेती प्रक्षेत्र यांना भेटी देणार आहे. तसेच नागपूर येथील लिंबुवर्गीय संशोधन केंद्र, गणेशखिंड जि. पुणे येथील फळ संशोधन केंद्र व अंबेजोगाई येथील सिताफळ संशोधन केंद्राला सुद्धा भेट देणार आहे. त्याचप्रमाणे शेतीविषयक अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञान जाणुन घेणार आहेत. यामुळे ते प्रगत तंत्रज्ञानाचे अनुभव आपल्या शेती व्यवसायामध्ये वापरून आपली आर्थिक उन्नती साधुन जिवनमान उंचावतील त्यामुळे जिल्ह्रातील विकासात त्यांचे योगदान असणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनात दि. 05 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर रोजी पर्यंत एकुण 10 दिवस आयोजीत करण्यात आला असून, या सोळाव्या कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम रमेश यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या.  तसेच सदर कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी सर्व पोलीस स्टेशन अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील, चंद्रकांत शेळके,अतुल सोनोने व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.