Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकऱ्यांनी सोयाबीनची उगवण क्षमता घरच्या घरी तपासावी

Get real time updates directly on you device, subscribe now.

– सोयाबीनची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर दि. ४ मे : पुढील महिण्यात होणाऱ्या पेरणीसाठी सोयाबीन बियाणाची पेरणीपुर्व उगवणक्षमता तपासणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांनी घरच्या घरी उगवणक्षमता तपासून घ्यावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये शेतकऱ्यांनी स्वतःकडील सोयाबीन बियाण्याची पेरणीपूर्वी उगवण क्षमतेची चाचणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे पेरणी करतेवेळी बियाणेचे प्रमाण किती ठेवावे याबाबत अंदाज येऊ शकतो. शेतकऱ्यांनी घरच्या घरीच उगवण क्षमतेची चाचणी करावी व चाचणीपूर्वी काळजी घ्यावी. शेतक-यांनी स्वत:कडे असलेले सोयाबीन बियाण्याची चाळणी करून त्यामधील काडीकचरा, खडे,लहान व खुरटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणीनंतर स्वच्छ झालेले समान आकाराचे बियाणे उगवण क्षमता चाचणीसाठी निवडावे.

अशी आहे उगवण क्षमता तपासण्याची प्रक्रिया : वर्तमानपत्राचा एक कागद घेवून त्याला चार घडया पाडाव्यात त्यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पुर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येक दहा बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी.अशा रीतीने १०० बियांच्या १० गुंडाळया तयार कराव्यात नंतर या गुंडाळया पॉलीथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात. जर ती संख्या ६० असेल तर उगवण क्षमता ६० टक्के आहे, असे समजावे. जर ती संख्या ८० असेल तर उगवणक्षमता ८० टक्के आहे असे समजावे. अशा पध्दतीने घरच्या घरी उगवण क्षमतेचा अंदाज घेता येतो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चांगली म्हणजे ७० टक्के पेक्षा जास्त असेल तर शिफारस केलेल्या मात्रेनुसार पेरणी साठी प्रति हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे. शेतकऱ्यांनी स्वतः कडील बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता उपरोक्त पद्धतीने घरच्या घरी तपासून नंतरच अशा बियाण्यांची पेरणी करावी. उगवण क्षमता 70 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्यास त्याच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. ऊगवण क्षमतेच्या प्रमाणात पेरणीसाठी किती बियाणे लागेल हे काढण्यासाठी 70 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 30 किलो प्रती एकर बियाणे आवश्यक आहे. 69 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 30.5 किलो प्रती एकर, 68 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 31 किलो प्रती एकर,67 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 31.5 किलो प्रती एकर,66 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 32 किलो प्रती एकर,65टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 32.5 किलो प्रती एकर,64 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 33 किलो प्रती एकर, 63टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 33.5 किलो प्रती एकर, 62 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 34 किलो प्रती एकर, 61टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 34.5 किलो प्रती एकर, 60 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 35 किलो प्रती एकर, उगवण क्षमतेनुसार बियाणांची आवश्यकता लागेल.

रायझोबियम व पीएसबी या जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणी पुर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून असे बियाणे सावलीत वाळवावे.पेरणीपुर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशी रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी पुरेशी ओलीवर आणि ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी दर ७० किलो वरून ५० ते ५५ किलो आणण्यासाठी
सोयाबीन बियाणे टोकण पध्दतीने किंवा प्लॅटरच्या सहाय्याने रूंद वरंबा सरी पध्दती (बी.बी.एफ) यंत्राने पेरणीबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करावे, याप्रमाणे शेतक-यांनी सुचनाचा अवलंब करावा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.