Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

फॅशन डिझायनर शिक्षक तरुणीची क्लासमध्येच गळफास घेऊन आत्महत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली, दि. १२ एप्रिल: मिरजेतील फुल मार्केट यार्डातील सेजल व्होकेशनल ट्रेंनिग इस्टिट्यूट मध्ये शिक्षक तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

फॅशन डिझायनिंग चा कोर्स शिकविणारी शिक्षिका दीपाली बाळासाहेब कलगुटगी (२४) हिने इन्स्टिट्यूट च्या इमारतीतील वर्गाच्या आत असलेल्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिरज दुय्यम बाजार आवर समितीमध्ये सेजल व्होकेशनल ट्रेंनिग इस्टिट्यूट आहे. दीपाली ही याच इस्टिट्यूट मध्ये फॅशन डिझायनिंग चा अभ्यासक्रम शिकवीत होती. काही दिवस ती नैराश्यात होती. सदर संस्था ही दिपाली च्या घराजवळ आहे. त्यामुळे दिपाली रविवारी तेथे गेली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी आली नसल्याने घरच्यांनी इस्टिट्यूटमध्ये जाऊन बघितले असता तिने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. आत्महत्येचे नेमके कारण काय आहे हे स्पष्ट झालेले नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दीपाली ने गळफास घेतल्याची घटना माहिती होताच घटनास्थळी लोकांची एकच गर्दी झाली. दिपाली ही मनमिळाऊ स्वभावाची असल्याने विद्यार्थ्यांसह जनमानसात तिने आपले नाव लौकिक केले होते. मात्र अचानक गळफास घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीसांना प्राप्त होताच घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेचा पंचनामा करून मृतक दीपालीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.