Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नरसिंहपल्ली येथील दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • रेंगुठा पोलिस व मुक्तिपथची संयुक्त कारवाई  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २७ मार्च: सिरोंचा तालुक्यातील नरसिंहपल्ली येथील दारूविक्रेत्याकडून २३ हजार ५५० रुपयांची विदेशी दारू जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजांना मालय्या चिलकामारी (६०) असे आरोपीचे नाव आहे. रेंगुठा पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नरसिंहपल्ली येथे अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती मुक्तिपथ तालुका चमूला प्राप्त झाली. माहितीच्या आधारे रेंगुठा पोलिस मदत केंद्राचे पोलिस कर्मचारी व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या एका दारूविक्रेत्याची चौकशी केली. यावेळी दारू विक्रेत्याच्या घरात २३ हजार ५५० रुपयांची विदेशी दारू आढळून आली. संपूर्ण मुद्देमाल जप्त करीत  राजांना मालय्या चिलकामारी या दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे परिसरातील दारूविक्रेते धास्तावले आहेत. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.