Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर त्या तुमनूरच्या महिलेचे पार्थिव पोहचले स्व:गावी!

Get real time updates directly on you device, subscribe now.

जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पुढाकाराने झाली मदत.

आदिवासी विध्यार्थी संघाचे सामाजिक दायित्व.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रतिनिधी- सचिन कांबळे

सिरोंचा, दि. १६ मार्च: तालुक्यातील तुमनूर चेक येथील महिला अंकुबाई चूक्कया निष्ठुरी (६०) यांची प्रकृती आठवड्याभरापासून आजारी असल्याने उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

डॉक्टरनी सदर महिलेचे पार्थिव त्यांच्या स्वगावी नेण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यावेळी महिलेचे पार्थिव घेऊन जाण्यासाठी आर्थिक अडचण असल्याने मृत परिवारातील सदस्यांनी तुमनुर चेकच्या आविसचे माजी सरपंच किरण वेमुला यांना माहिती दिली. त्यांना हि माहिती प्राप्त होताच जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना गडचिरोली येथे भ्रमणध्वनीद्वारे मृत झालेल्या परिवाराच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून पार्थिव घेऊन स्वगावी जाणे शक्य नाही. असे सांगताच अजय कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न करता अहेरी येथील आदिवासी विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली.

त्यावेळी कार्यकर्त्यांनी पार्थिव घेऊन जाण्यासाठी स्व:खर्चातून गाडीची व्यवस्था करून दिली. त्यानंतर मृतक महिलेच्या परिवारातील सदस्यांनी आम्हासारख्या गोर गरिबांसाठी आरोग्याची समस्या असेल किंवा कुठलीही अडचण असेल त्या अडचणीत आदिवासी विद्यार्थी संघटना मदत करण्यासाठी समोर आल्याने समाधान व्यक्त केले आहे.  

या मदतीसाठी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, आविसचे शहर अध्यक्ष प्रशांत गोडशेलवार, प्रकाश दुर्गे, सुदामा हलदर यांनी उप जिल्हा रुग्णालय अहेरी ते सिरोंचा तालुक्यातील तुमनुर चेक येथे मृतक महिलेचे पार्थिव वाहनाने पाठविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.    

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.