Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आजाराने ग्रस्त असलेल्या नागेपल्लीच्या “त्या” मुलीला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार कडून आर्थिक मदत

बुर्क मलपल्ली येथील मंगला गणेश सिडाम या मुलीच्या पोटात आजार असल्याने मिळाला परिवाराला आर्थिक आधार .

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी 24 जुलै : बुर्क मलपल्ली येथील इंदुबाई सिडाम यांच्या मुलीला पोटाच्या विकाराने ग्रासले असल्याने सदर माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलवार यांना होताच मुलीचं आरोग्य सुदृढ होण्यासाठी आर्थिक मदत करून रुग्णालयात जाण्यास मदत केल्याने मोठा आधार मिळाला आहे.

बुर्क मलपल्ली येथील इंदू बाई सिडाम हे दारिद्र्य रेषेखालील असलेले कुटुंब असून आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हलाखीचे जीवन जगत असताना त्यांच्या 16 वर्षाच्या मुलीला अचानक पोटाच्या विकाराने ग्रासल्याने जेमतेम परिस्थिती असतानाही मुलीच्या आजारासाठी खाजगी रुग्णालयात वाटेल ते खर्च करून विकार दूर होईल यासाठी प्रयत्न केले. मात्र पोटाचा विकार दूर न झाल्याने आणि आपल्या परिवाराचा प्रपंच चालवण्यासाठी आजारामुळे आर्थिक चणचणीत आलेल्या कुटुंबाला जणू  देवदूतच मिळाले.मुलीच्या प्रकृतीसाठी कोणी मदतीचा हात समोर करत नसताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संकट समयी मदतीचा हात समोर करून मुलीला पोटाचा विकार दूर करण्यासाठी आर्थिक मदत करून रुग्णालयास तात्काळ घेऊन जाण्यास सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे परिवाराला कठीण समयी देवदूतच उतरले असून आम्हाला मोठ्या संकटातून काढण्यासाठी मोठी मदत झाल्याने परिवाराला कडून अजय कंकालवार यांचे कौतुक केले. यावेळी  प्रशांत गोडसे, मिलिंद अलोने, दिवाकर मडावी, महेश वडेट्टीवार आदी उपस्थित होते .

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

एसटीची पलटी झाल्याने २२ प्रवासी जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.