Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पहिला तरंगता सौर उर्जा प्रकल्प महाराष्ट्रात

प्रतियुनिट दर केवळ 4 रूपए

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 22 ऑक्टोबर :-  चंद्रपूर जिल्ह्यातील ईराई धरणात महाराष्ट्रातील पहिला 105 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर उर्जा प्रकल्प उभा राहणार आहे. त्यासाठी महानिर्मिती आणि सतलज जल विद्यूत निगममध्ये (एसजेव्हीएम) करार झाला आहे. पुढील पंधरा महिन्यात या प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होणार असून त्याचा प्रतियुनिटचा दर केवल 3 रूपये 93 पैसे असणार आहे. येथे तयार होणारी वीज पुढील 25 वर्षे महानिर्मितीला पुरवली जाणार आहे.

कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती करतांना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. तसेच दिवसेंदिवस कोळशाच्या किमती वाढत असल्याने विजेच्या दरात वाढ होत आहे. या पार्श्वभुमीवर महानिर्मिती ने अपारंपारिक उर्जा निर्मितीची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असून चंद्रपूर जिल्ह्यातील ईराई धरणात तरंगता सौर उर्जा प्रकल्प उभारण्यासाठी टेंडर मागवले होते. त्यानुसार 105 मेटावॅटचा सौर उर्जा प्रकल्प उभारणे, चालवणे आणि वीजनिर्मिती करण्याचे टेंडर दिले आहे. हा प्रकल्प धरणातील पाण्याच्या पृष्ठभागावर 525 एकर जागेत असणार आहे. त्याच्या उभारणीसाठी सुमारे 730 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. दरम्यान, एसजेव्हीएमने यासाठी 1000 मेगावॅटचा तरंगता सौर उर्जा प्रकल्प उभारला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

‘आनंदाचा शिधा’ वाटप करून दिवाळी भेट दिली – आम. डॉ देवराव होळी  

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याची होणार पुन्हा चौकशी

Comments are closed.