Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्कॉर्पिओ-ट्रॅव्हल्स भीषण धडकेत पाच ठार, सात गंभीर

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : लग्नाच्या आनंदाने निघालेली वरात काही क्षणांत शोककळेत बदलली. गडचिरोली–चामोर्शी मार्गावरील कुरुड-कढोली गावादरम्यान नाल्याजवळ स्कॉर्पिओ आणि ट्रॅव्हल्स वाहनाची भीषण धडक होऊन पाच जणांचा मृत्यू, तर सात जण गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघाताने संपूर्ण परिसर हादरला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ वाहनात एकूण १६ जण प्रवास करत होते. रामपूर येथून लग्न समारंभ आटोपून हे सर्वजण भाडबिडी मोकासा येथे परतत होते. दरम्यान समोरून येणाऱ्या त्रिवेणी अर्थमुवर्सच्या ट्रॅव्हल्सशी स्कॉर्पिओची जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की स्कॉर्पिओ वाहन अक्षरशः चकनाचूर झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अपघातानंतर जखमींना तातडीने बाहेर काढून गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असताना वाटेतच दोघांचा मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून लग्नाच्या आनंदावर काळाचा क्रूर घाला पडल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.