राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात माजी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण व वृक्षारोपण
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
अहेरी, 14 ऑगस्ट 2023 : माजी पालकमंत्री श्रीमंत राजे अमब्रिशराव यांच्या हस्ते स्थानिक धर्मराव विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या 77 व्या दिनानिमित्त ध्वजारोहण महाविद्यालयाच्या पटांगणात करण्यात आले. सोबतच अवधेश राव बाबा, प्राचार्य डॉ. मनोरंजन मंडल यांच्यासह पालकमंत्र्यांनी परिसरात राष्ट्रीय सेवा योजना पथक प्रमुख प्रा. तानाजी मोरे यांच्या नेतृत्वातील विद्यार्थ्यांसह विविध प्रकारची झाडे लावून वृक्षारोपण केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुनंदा पाल तर समारोप प्रा. रमेश हलामी यांनी केले. यावेळी डॉ एल एच रोहनकर, प्रो अतुल खोब्रागडे, डॉ एस के विश्वास, प्रा. कांचन धुर्वे, प्रा. वनकर, प्रा. राठोड तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हे पण वाचा :-


Comments are closed.