Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

84 आदिवासी मजुरांवर दाखल केलेले वनगुन्हे मागे घ्या

शिष्टमंडळासह आदिवासी बांधवांनी घातले वनमंत्र्यांना साकडे, आदिवासींवर दाखल केलेले वन गुन्हे मागे घ्यावे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,  09 नोव्हेंबर :- कमलापूर वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या कोरेपल्ली ते आशा या रस्त्याच्या कामावर मजूरीकरीता गेलेल्या आदिवासी मजूरांवर सिरोंचा वनविभागने संबंधित रस्त्याच्या कंत्राटदाराला सोडून अवैध वृक्षतोडी करीता आदिवासींवर वन गुन्हे दाखल केले आहे. हे त्या आदिवासींवर अन्यायकारक आहे. त्यामुळे 84 आदिवासी मजुरांवर दाखल केलेले  वनगुन्हे मागे घ्या अशी मागणी  शिष्टमंडळासह आदिवासी बांधवांनी वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. यावेळी मंत्री मुनगंटीवार यांनी गडचिरोलीच्या मुख्य वनसंरक्षक यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून अहवाल द्याव असे निर्देश दिले आहेत.

गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम, आदिवासी व मागास जिल्ह्याच्या रूपाने परिचित आहे. अशात येथील आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध नही. त्यांच्या हाताला काम नाही. अशावेळे आदिवासी नागरिक मिळेल ते काम करून आपले जीवनयापन करत असतात. अशावेळी काही कंत्राटदार त्यांची दिशाभुल करून त्यांच्या कडून अवैध वृक्षतोडी सारखे काम करवून घेतात. कमलापूर वनपरिक्षेत्रातील कोरेपल्ली ते आशा या रस्त्याचे काम मंजूर असल्याचे सांगून कंत्राटदाराच्या काही लोकांनी मशिनरी लावून झाडे तोडण्याचे काम केले होते. मात्र, सदर कामाला केंद्र सरकारची अंतिम मंजूरी नसल्याची बाब समोर आली आहे. मात्र, वनविभागाने संबंधित कंत्राटदारा ला सोडून आदिवासी मजूरांवर अवैध वृक्ष तोड केल्याचा ठपका ठेवून तब्बल 84 आदिवासी बांधवांवर वन गुन्हे दखल केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रकारणाची कमलापूर वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या चैकशी केली असता आदिवासी मजूरांची दिशाभुल करून त्यांच्या कडून वृक्षतोड करवून घेतली गेली ही बाब त्यांना लक्षात आणून दिली. तरीही कंत्राटदारावर गुन्हा दाखल न करता आदिवासींवर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे त्या आदिवासींवर अन्याय आहे. त्यामुळे आदिवासींवर जे वनगुन्हे दाखल करण्यात आले आहे ते मागे घेण्यात यावे अशी मांगणी अन्यासग्रस्त आदिवासी मजूरांनी केली आहे. निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार सह लच्चा रामा अलाम, गिल्ला लिंगा गावडे, प्रमोद कोडापे, आशिष सडमेक, दादाराव सडमेक सह अन्यायग्रस्त आदिवासी मजूर हजर होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.