माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम कोरोना पॉझिटिव्ह!
भेटी व संपर्कात आलेल्यानी काळजी घेण्याचे केले आवाहन .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:१६डिसेंबर
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम हे 10 डिसेंबर रोजी मुंबईवरून गडचिरोलीत आले असून काल मंगळवार 15 डिसेंबर रोजीत्यांची कोवीड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे .जिल्ह्यातील संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घेऊन स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि इतरांसोबत तात्काळ संपर्क टाळावे असे आवाहन स्वतः भाग्यश्रीताईंनी केले असून संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी व खबरदारी घेण्याची विनंती केले आहे.
कोणीही घाबरू नये, पण मास्क, सॅनिटायझरचा वापर करावे, गर्दी टाळावे, वारंवार हात धूत राहावे, स्वछता बाळगावे आणि योग्य ती काळजी घ्यावे तसेच संपर्कात आलेल्यांनी स्वतःची तपासणी करून योग्य ती काळजी घेण्याचेही आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले आहे.
Comments are closed.