Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चार जहाल माओवादी ठार, शस्त्रसाठा जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: जिल्ह्याच्या अंतिम टोकावर तसेच छत्तीसगड राज्याच्या नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात झालेल्या भीषण चकमकीत पोलिसांना मोठे यश मिळाले असून चार जहाल माओवादी ठार झाले आहेत. यामध्ये एक पुरुष व तीन महिला माओवादींचा समावेश आहे. घटनास्थळावरून एक एसएलआर रायफल, दोन इन्सास रायफल आणि एक .303 रायफल असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

२५ ऑगस्ट रोजी गडचिरोली विभागातील गट्टा दलम, कंपनी क्रमांक १० व इतर माओवादी दबा धरून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-६० च्या १९ पथकांसह सीआरपीएफच्या दोन क्यूएटी पथका जंगलात रवाना करण्यात आल्या. मुसळधार पावसामुळे मोहिमेला विलंब झाला, मात्र आज सकाळी जवानांनी शोधमोहीम सुरू केली. त्या वेळी माओवादींकडून अचानक अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.

जवानांनीही तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिल्याने तब्बल आठ तास चकमक सुरू राहिली. त्यानंतर परिसरात शोध घेतल्यावर चार माओवादींचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. दरम्यान या भागात अजूनही उर्वरित माओवादी लपून बसले असण्याची शक्यता वर्तवली जात असून शोधमोहीम सुरूच आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ही कारवाई गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी मोहिमेत एक महत्त्वपूर्ण यश ठरली असून मुसळधार पावसातही जीवाची पर्वा न करता जवानांनी दाखविलेल्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments are closed.