खा.अशोक नेते यांच्या हस्ते प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे मोफत अन्नधान्याचे वितरण
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, दि. २ ऑक्टोंबर : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारच्यावतीने देशातील 80 कोटी गोरगरीब जनतेला मोफत अन्नधान्य देण्यात येत आहे. गडचिरोली येथील अन्नधान्य दुकानाला खा. अशोक नेते यांनी भेट दिली व अन्नधान्य उपलब्धते बाबत विचारपूस करुन गरीबांना अन्नधान्याचे वाटप केले.
मोफत अन्नधान्य वितरणाच्या वेळी प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, डाॅ.भारत खटि जिल्हा उपाध्यक्ष, विलास पाटील भांडेकर, तालुका संपर्क प्रमुख, पांडूरंग जी भांडेकर,उपस्थित होते

अन्नधान्य लाभार्थांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करनारे पोस्ट कार्ड पत्रही यावेळी दिले.
भारत सरकारच्या वतीने देशातील सर्व राज्यांमध्ये गोर-गरीब नागरिकांना रेशन दुकानामार्फत मोफत अन्न-धान्य दिल्या जात आहे. मात्र भाजपाची सत्ता नसलेली काही राज्य मोफत अन्न-धान्य राज्य सरकार द्वारा दिल्या जात असल्याचे खोटे सांगत आहेत.
सदर योजना केंद्र सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू केली असून कोविड-19 मध्ये रोजगार हिरावलेल्या गरीब, कामगार नागरिकांना मोफत अन्न-धान्याचा पुरवठा केल्या जात आहे. खा. अशोक नेते यांच्या हस्ते रेशनकार्ड धारकांना 5 किलो गहू व 5 किलो तांदुळाचे वाटप करण्यात आले.

Comments are closed.