उद्यापासुन आरमोरी तालुक्यात काँग्रेसचीजनसंवाद पदयात्रा सुरू
8 व 9 सप्टेंबर दोन दिवस चालणार आरमोरी तालुक्यात पदयात्रा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
आरमोरी, 7 सप्टेंबर : जनतेला भरमसाठ खोटी आश्वासने देऊन केद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. हे सरकार आल्यापासून देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्र पुर्णपणे बिघडले. भारताची लोकशाही व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान धाब्यावर बसवून मोदी सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे सर्व सरकारी यंत्रणांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढलेला आहे यातुन निवडणूक आयोग व न्याय व्यवस्थाही सुटलेली नाही.तसेच शेतकरी सातत्याने अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करत असताना सरकारने मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची क्रुर थट्टा केली. दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी आत्महत्या करत आहे.
आज लोकांच्या समोर अनेक समस्या आहेत त्यांचे दुःख वेदना व व्यथा भाजपा सरकार समजून घ्यायला तयार नाही. म्हणून काँग्रेस नेते माननीय राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत 3570 किलोमीटर पायी चालवून भारत जोडून यात्रेच्या माध्यमातून लोकांशी थेट संवाद साधला व त्यांचे दुःख वेदना जाणून घेतल्या भारत जोडो यात्रेच्या धरतीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही राज्यातील सर्व जिल्ह्यात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांची संवाद साधत आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 8 व 9 सप्टेंबर रोजी आरमोरी तालुक्यात जनसंवाद पदयात्रा निघणार आहे.
दिनांक 8 सप्टेंबरला सकाळी 7.30 वाजता आरमोरी तालुक्यातील बोडधा येथून या पदयात्रेचा शुभारंभ होत असून बोडधा, वडधा येथेही यात्रा निघणार आहे. दुपारी दोन वाजता डार्लिं, नरोटिमाल, विहीरगाव, कोरेगाव,परसवाडी सलंगटोला, येनगाडा, पिसेवडधा, या ठिकाणी यात्रेचे आयोजन केलेले आहे. दिनांक 09 सप्टेंबर शनिवारला सकाळी 7.30 वाजता मानापुर येथून यात्रेला शुभ यात्रेचा शुभारंभ होत असून मानापूर, देलनवाडी, नागरवाही, शिवनी फाटा, मोहजरी, सुकाळा व दुपारी दोन वाजता चामोर्शीमाल, वनकी, वासाळा, ठाणेगाव व आरमोरी येथे पदयात्रा चालणार आहे. सदर जनसंवाद पद यात्रेला जास्तीत जास्त काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
हे पण वाचा :-
Comments are closed.