Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जि.प. अभियंता संघटनेच्या लेखणी बंद आंदोलनाला मा.खा.अशोकजी नेते यांची भेट…

अभियंता च्या विविध मागण्या शासन दरबारी धरुन योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार...मा.खा.नेते.

0

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली: जि.प.अभियंता संघटना महाराष्ट्र शाखा गडचिरोलीच्या वतीने विविध मागण्याबाबत २७ ऑगस्टपासून असहकार आंदोलन व लेखणी बंद आंदोलन पुकारलेले आहे.दि.९ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथील जि.प. कार्यालयासमोर दिं.5 सप्टेंबर पासून सुरु असलेल्या बेमुदत लेखणी बंद आंदोलनाला माजी खासदार तथा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी या आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांशी चर्चा व त्यांच्या विविध मागण्या समजून घेत आपल्या मागण्या शासन दरबारी धरुन योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे यावेळी मा.खा.नेते यांनी आश्वासित केले.
जि.प.अभियंता संघटनेच्या विविध मागण्या – मागण्यांमध्ये एकस्तर योजनेअंतर्गत कनिष्ठ अभियंत्यांना उपअभियंता पदाचे वेतन देण्यात यावे, कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यकांची प्रवास देयके तत्काळ द्यावी, कार्यालयाकडून वाहन किंवा अग्रीम देण्यात आल्यास बांधकामावर दौरा करण्यात येईल, कोणताही बांधकामात अनियमिता झाल्यास फक्त कनिष्ठ अभियंता यांना जबाबदार न धरता साखळीतील सर्व जसे कंत्राटदार उपाभियंता, कार्यकारी अभियंता यांना समप्रमाणात जबाबदार धरण्यात यावे, स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यकांना घरकुलाच्या कामातून मुक्त करावे, स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यकांना दौऱ्याकरिता‌‌ मोटरसायकल वापरण्याची परवानगी देण्यात यावी, कनिष्ठ अभियंता बांधकाम संवर्गाची सेवाज्येष्ठता सूची विलंबाने व सदोष सादर केल्याने शासन स्तरावर १ जानेवारी २०२४ ची सेवा ज्येष्ठता सूची अंतिम करणे प्रलंबित आहेत. संबंधितावर कारवाई करण्यात यावी,असे अभियंता संघटनेच्या मागण्या आहेत.

यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, जि. प. अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. के. एस. ढवळे, सचिव इंजि. बी. पी. झापे,धनंजय सहदेवकर, तसेच मोठ्या संख्येने आंदोलनाला अभियंता उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Leave A Reply

Your email address will not be published.