Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने उपपोस्टे पेरमिली येथुन प्रोजेक्ट कृषी समृद्धी योजनेची प्रायोगिक तत्वावर सुरवात

  • अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांना मिळाले शेवगा लागवडीचे मोफत मार्गदर्शन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. ९ एप्रिल: आदिवासी बहुल म्हणुन ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा शेती व शेती संसाधनाच्या बाबतीत मागासलेला असुन त्यांना प्रगत शेतीच्या दिशेने घेवुन जाण्याकरिता व त्याचे जीवनमान उंचावण्याकरिता गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट कृषीसमृद्धी राबवत असुन त्याचाच एक भाग म्हणुन गडचिरोली पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतुन उपपोस्टे पेरमिली येथे शेवगा शेती लागवड व प्रशिक्षण कार्यक्रम आज पार पडला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाच्या सुरवातीला पोलीस उपनिरीक्षक धनंजय पाटील लिखीत शेवगा लागवड पुस्तिकेचे प्रकाशन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर शेवगा शेती संबधींत मार्गदर्शनपर व्हिडीओचे सादरीकरण व शेतकऱ्यांना पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते १५००० शेवगा रोपांचे वाटप करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करतांना पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी पारंपारीक पीकाशिवाय इतर उत्पादन घेतांना दिसुन येत नाही, शेती हे केवळ उपजीवीकेचे साधन न राहता आर्थिक उत्पन्न वाढीचा स्त्रोत बनावा यासाठी शेतकरी बांधवांना नविन पीक पध्दतीचे मार्गदर्शन व प्रशिक्षण, मोफत बि-बियाणे व रोपे वाटप करुन कृषी विषयक जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरु आहे. कृषी समृदधी उपक्रमांतर्गत प्रायोगिक तत्वावर जिल्हाभरातील होतकरु व गरजु शेतकऱ्यांना मोफत शेवगा रोपे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे तुमचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. तसेच पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी शेवगा शेंगामुळे आर्थिक लाभ मिळणारच त्याच बरोबर शेवगा शेंगा व झाडाची पाने पौष्टीकतेत अतिशय समृध्द आहेत असे सांगीतले.

कार्यक्रमाच्या शेवटी शहीद स्मृती स्थळ एक खिडकी योजनेचे पोलीस अधीक्षक यांचे हस्ते उद्घाटन झाले.

सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमास मनिष कलवानिया अपर पोलीस अधीक्षक (अभीयान), सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक अहेरी, राहुल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि. महादेव शेलार, पोउपनि. पंकज सपकाळे, प्रभारी अधिकारी उपपोस्टे पेरमिली, पोउपनि. धनंजय पाटील, उपपोस्टे पेरमिली तसेच उपपोस्टे पेरमिलीचे अधिकारी, पोलीस अंमलदार, पेरमिलीचे सरपंच किरण नैताम व प्रायोगिक तत्वावर शेवगा शेतीची सुरवात करुन शेवगा शेंगाचे भरघोस उत्पन्न घेत असलेले मौजा आलदंडीचे शेतकरी वारलु नैताम तसेच अहेरी उपविभागातील शेतकरी उपस्थित होते.


Comments are closed.