Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

49 हरवलेले मोबाईल शोधुन काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

सायबर पोलीस ठाणे गडचिरोली कडुन शोध घेतलेल्या ४९ मोबाईलचे वाटप.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 13 एप्रिल : 2022 या वर्षात एकुण 150 मोबाईल ज्यांची किंमत जवळपास 22 लाख रुपये एवढ्या किमतीच्या मोबाईलचा शोध सायबर पोलीस स्टेशन मार्फत घेवून ते मोबाईल संबंधीत व्यक्ती यांना देण्यात आले, तसेच सन 2023 मध्ये एकुण 49मोबाईलचे वाटप करण्यात आले असून अंदाजे किंमत एकुण 7.50 लाख रुपये एवढी आहे. व दिनांक 11-04-2023 रोजी मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, यांचे हस्ते ३१ मोबाईल संबधीत व्यक्तींना प्रदान करण्यात आले आहे.

तरुणपिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असून मोबाइल हाताळतांना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविले गेल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबधीत पोलीस स्टेशनच्या मार्फतीने गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली जाते. सदर बाबत सायबर पोलीस स्टेशनमध्ये चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जातो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मोबाईल हरविले किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलव्दारे सायबर गुन्हे घडण्याची जास्तीत जास्त शक्यता असल्यामुळे हरविले किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक आहे. या बाबीचा विचार करुन सायबर पोलीस स्टेशन मार्फत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येतो.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, ना.अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन)  कुमार चिंता, मा. अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख सा. अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टे येथील प्रभारी अधिकारी  उल्हास भुसारी, पोउपनि निलेश ठाकरे, पोउपनि निलेश वाघ व पोलीस अंमलदार मनापाअं / ६३८ वर्षा चहिरवार, मनापोअं/ २९१८ संगणी दुर्गे, मनापोअं / गायत्री नैताम, मपोअं/ किरण रोहणकर, पोअं/ ५५५३ योगेश खोब्रागडे, पोअं सचिन नैताम यांनी पार पाडली,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मा. पोलीस अधीक्षक  नीलोत्पल सा. यांचतर्फे जनतेला असे आवाहन करण्यात येत आहे की, सध्या सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत असून, सायबर गुन्हेगारामार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून फसवणुक केली जाते. त्यामुळे जनतेनी सायबर गुन्हेगारांपासुन सावध राहावे व आपल्यासोबत काही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.