Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हरवलेले व चोरीला गेलेले 67 मोबाईल फोन शोधुन काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

सायबर पोलीस ठाणे गडचिरोली कडुन शोध घेतलेल्या 67 मोबाईलचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते वाटप.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली- गडचिरोली पोलीस विभाग कडून सायबर पोलीस स्टेशन मार्फत हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा तांत्रीक कौशल्याचा वापर करुन  मागील वर्षी सन 2023 मध्ये एकुण 135 मोबाईलचा शोध घेण्यात आला असुन त्यांची अंदाजे किंमत एकुण 20,27,000/- रुपये एवढी होती. तसेच माहे जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 या तीन महिन्याच्या कालावधीत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या 67 मोबाईलचा शोध घेवुन आज दि. 05 आक्टोबर रोजी सर्व मोबाईल संबंधित तक्रारदारांना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते सुपुर्द करण्यात आले आहे. त्यांची अंदाजे किंमत एकुण 12,00,160/- रुपये आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जनतेला आवाहन केले की, “सध्या सायबर गुन्ह्राचे प्रमाण वाढत असुन, सायबर गुन्हेगारंामार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवुन फसवणुक केली जाते. यासोबतच डिजीटल अरेस्टद्वारे व आर्टीफिशीयल इंटीलेजन्स (ॠक्ष्) च्या सहाय्याने कोणाच्याही संवेदनशिल फोटोंना एडीट करुन लोकांची फसवूणक केली जाते, त्यामुळे जनतेने सायबर गुन्हेगारांपासुन सावध राहावे. आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली असेल तर 1930 या नंबरवर तक्रार नोंदवावी व मोबाईल चोरी झाला असेल तर, तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन तसेच सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.