Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळुन लावण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

नक्षलवाद्यांचा शस्त्र तयार करण्याचा कारखाना केला उध्वस्त

गडचिरोली, दि. ५ मार्च: दि. ०४ मार्च २०२१ रोजी मौजा मुरुमभुशी गावाजवळ महाराष्ट्र-छत्तीसगड जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान (सी-६०) नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना संशयास्पद नक्षल दलम आढळुन आले. नक्षलवाद्यांनी प्रथम पोलीस जवानांवर गोळीबार केला. नक्षलवाद्यांच्या विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्यास चोख प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांवर गोळीबार केला. त्याचक्षणी नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. त्या भागातशोध मोहीम राबविली असता, त्या परिसरातील एका कॅम्पमध्ये नक्षलवाद्यांच्या शस्त्र तयार करण्याच्या मशिनरी आढळुन आल्या. सदर मशिनरी पोलीस जवानांनी उद्ध्वस्त केल्या. सदर ठिकाणावरुन जवान परत येत असतांना नक्षल दलमनी पुन्हा पोलीस पथकांवर गोळीबार केला. त्यांना पोलीस पथकाने प्रत्युत्तर दिले असता नक्षलवादयांनी पळ काढला.

सदर जंगल परिसरात नक्षल्यांचा शस्त्र तयार करण्याचे साहित्य आढळल्याने त्या भागात नक्षल असल्याचा संशय बळावला. त्यामुळे दिनांक ०५ मार्च २०२१ रोजी पुन्हा त्याच भागात अभियान राबविण्यासाठी काही विशेष अभियान पथक (सी-६०) घटनास्थळावर पाठविण्यात आले. विशेष अभियान पथकाच्या दोन्ही समुहांनी नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांचे मोठया प्रमाणात नुकसान केले व नक्षली हल्ला परवुन लावण्यात यश मिळवले. या अभियानादरम्यान एका जवानाच्या पायाला गोळी लागली असुन त्याला पुढील उपचाराकरीता हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आले आहे. जखमी जवानाची प्रकृती स्थिर आहे. नक्षलविरोधी उत्कृष्ट कारवाई करणाऱ्या जवानांचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभिनंदन केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.