Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षलवादयांचा घातपाताचा कट उधळुन लावण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली २३फेब्रुवारी :- एटापल्ली उपविभागा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केन्द्र  कोटमी कार्यक्षेत्रातील मौजा कोकोटी या जंगल परिसरात नक्षल संदर्भात पोलीस विभागाला गोपनिय माहीती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक श्री. मनिष कलवानिया यांचे नेतृत्वात विशेष अभियान पथक गडचिरोलीसह विशेष कृती दल व पोमके कोटमीचे जवान नक्षलविरोधी अभियान रवाना होवून घटनेच्या दिशेने गेले असता सकाळी ०९:३० वाजेच्या सुमारस मौजा कोकोटी गावाच्या उत्तरेला असलेल्या जंगल परिसरातील पहाडी भागात नक्षलवाद्यांनी कॅम्प लावलेला असल्याचे संशयास्पद हालचाली  दिसुन आल्याने, जवान नक्षलवाद्यांच्या दिशेने आगेकुच करीत असतांना

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

, जवानांना पाहुन जेवण बनविण्याच्या तयारीत असलेले  नक्षलवाद्यांनी प्लॉस्टिक शिट, स्वयंपाकाचे भांडे, भाजीपाला, राशन, पिण्याचे पाणी, चप्पल, जुते, कपडे, पिट्ट तसेच खुप मोठया प्रमाणावर असलेले जीवनावश्यक साहित्य सोडुन घनदाट जंगलाच्या दिशेने पळ काढला. जवानांनी सदर परिसरात शोध अभियान राबविले असता, पहाडीच्या पुर्व दिशेला ०१ व पश्चिम दिशेला ०१ असे दोन इलेक्ट्रीक वायर दिसुन आले.

सदर इलेक्ट्रीक वायर वरुन नक्षलवाद्यांकडुन घातपाताची योजना असावी असा संशय आल्याने बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडुन घटनास्थळाची तपासणी केली असता, नक्षलवाद्यांनी घातपाताचे उद्देशाने १० किं.ग्रॅमचे दोन ब्लॉस्ट पुरुन ठेवलेले असल्याचे आढळुन आले. नक्षलवाद्यांनी जमिनीत पेरुन ठेवलेला ब्लॉस्ट जमिनीबाहेर काढणे धोक्याचे असल्यामुळे बीडीडीएस पथकाकडुन जागेवरच नाश करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा


सदरचे कृत्य कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब) भादंवि सहकलम ४,५ भास्फोका
अन्वये होत असल्याने, सदर भागात सक्रीय असणाऱ्या कंपनी क्र.०४ चा कमांडर नामे प्रभाकर
ऊर्फ रवि ऊर्फ प्रकाल वीर ऊर्फ पदकाला स्वामी ऊर्फ लोकेटी चंदर राव तसेच कसनसुर दलम
डिव्हीसीएम व सहकारी नक्षलवाद्यांवर पोमके रेगडी येथे फिर्याद नोंदवण्यात आली आहे.
नक्षलविरोधात महत्वपुर्ण कारवाई करत नक्षलवादयांचा घातपाताचा कट उधळुन लावणाऱ्या
जवानांच्या शौर्यपुर्ण कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल साो. यांनी कौतुक केले
असुन नक्षलविरोधी अभियान, अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.


Comments are closed.